Akshata Chhatre
लग्न हे फक्त दोन व्यक्तींचे मिलन नसून दोन आयुष्यांचे एकत्र येणे आणि दोन कुटुंबांचे नाते जोडणारे बंधन आहे. त्यामुळे लग्नाआधी एकमेकांना नीट समजून घेणे आणि ओळख करून घेणे अत्यावश्यक आहे.
ही समज असल्यास पुढे काही समस्या आल्या तरी त्यावर उपाय शोधणे सोपे जाते.
सर्वप्रथम, पैशांचे व्यवस्थापन ठरवा, खर्च समान वाटला जाणार का उत्पन्नानुसार, संयुक्त खाते ठेवायचे का स्वतंत्र.
तुमचे संगोपन वेगवेगळे असू शकते, त्यामुळे एकमेकांकडून किंवा पालकांकडून असलेल्या अपेक्षांवर मोकळेपणाने चर्चा करा.
तुमचे राजकीय आणि सांस्कृतिक विचार समान आहेत का वेगळे, आणि मतभेद असतानाही एकत्र राहू शकता का, हे जाणून घ्या.
काही अशा गोष्टी ज्या तुम्ही कधीच स्वीकारणार नाही. उदा. पाळीव प्राणी पाळणे, शहर बदलणे, किंवा वेगळ्या बेडवर झोपणे यावर आधीच चर्चा करा.
शेवटी, एकमेकांची स्वप्ने जाणून घ्या. एका वर्षात, पाच वर्षांत किंवा निवृत्तीनंतर तुम्ही स्वतःला कुठे पाहता हे स्पष्ट करा. या सर्व चर्चेमुळे नातेसंबंध अधिक मजबूत बनतात.