Manish Jadhav
ऑफिसमध्ये सहकाऱ्यांविषयी अफवा पसरवणे किंवा त्यांच्या पाठीमागे गॉसिपिंग करणे ही सर्वात वाईट सवय मानली जाते. यामुळे ऑफिसमधील वातावरण तर बिघडतेच, पण तुमची प्रतिमा देखील एक 'नकारात्मक व्यक्ती' म्हणून तयार होते.
दुसऱ्या सहकाऱ्याने केलेल्या कामाचे किंवा आयडियाचे श्रेय स्वतः लाटण्याचा प्रयत्न कधीही करु नका. असे केल्याने टीममधील विश्वास संपतो आणि भविष्यात कोणीही तुमच्यासोबत काम करण्यास तयार होत नाही.
दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न करणे किंवा सतत मीटिंग्सना उशिरा येणे यामुळे तुमची व्यावसायिकता (Professionalism) धोक्यात येते. यामुळे वरिष्ठांचा तुमच्यावरील विश्वास कमी होतो.
कामाच्या ठिकाणी आव्हाने आणि अडचणी येतच असतात. परंतु, समस्येवर तोडगा काढण्याऐवजी प्रत्येक गोष्टीबद्दल सतत तक्रार करत राहिल्याने सहकाऱ्यांवर आणि कामावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो.
ऑफिसचा इंटरनेट, लॅपटॉप, प्रिंटर किंवा इतर कोणतीही साधनसामग्री स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी अतिप्रमाणात वापरणे टाळावे. हा देखील कंपनीच्या पॉलिसीचा आणि वर्क एथिक्सचा भंग मानला जातो.
कामाच्या दबावामुळे किंवा वादामुळे ऑफिसमध्ये सर्वांसमोर जोरात ओरडणे, रडणे किंवा राग अनावर होऊन चुकीचे शब्द वापरणे अत्यंत अयोग्य आहे. कितीही कठीण परिस्थिती असली तरी स्वतःला शांत ठेवणे गरजेचे आहे.
ऑफिसच्या वेळेत सतत वैयक्तिक फोन कॉलवर व्यस्त राहणे, घरगुती वाद ऑफिसमध्ये आणणे किंवा वैयक्तिक कारणांमुळे कामाकडे दुर्लक्ष करणे टाळावे. यामुळे तुमच्या कामाचा दर्जा घसरु शकतो.