Akshata Chhatre
फक्त बागा आणि कलंगुटवरच थांबू नका. दक्षिण गोव्यातील शांत समुद्रकिनारे आणि निसर्गरम्य ठिकाणेही बघा.
गोव्यात समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त अनेक ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत. तीही बघा
विमानतळावरून टॅक्सीने जाताना जास्त पैसे देऊ नका. बस किंवा प्रीपेड टॅक्सीचा पर्याय निवडा.
गोव्यातील स्थानिक पदार्थ खायला विसरू नका. हॉटेलच्या जेवणापेक्षा स्थानिक जेवण अधिक चविष्ट आणि स्वस्त असते.
वैध लायसन्सशिवाय गाडी भाड्याने घेणे टाळा. यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते आणि दंडही भरावा लागू शकतो.
गोव्यात कुठेही कचरा टाकू नका.
रास्ता जाणून घेण्यासाठी नेटवर्कवर अवलंबून राहण्यापेक्षा गुगल मॅप्स वापरा.