Akshata Chhatre
तुमच्या 'एक्स'बद्दल सतत तक्रार करणे टाळा. यामुळे तुम्ही अजूनही जुन्या नात्यात अडकलेले आहात, असा समज पार्टनरचा होऊ शकतो.
दुसऱ्या-तिसऱ्या भेटीतच लग्न किंवा मुलांच्या नावांवर चर्चा केल्याने पार्टनरला दडपण येऊ शकते. नात्याला नैसर्गिकरीत्या पुढे जाऊ द्या.
प्रत्येक कुटुंबात वाद असतात, पण सुरुवातीलाच ते सांगणे टाळा. यामुळे तुमच्या कुटुंबाबद्दल पार्टनरच्या मनात नकारात्मक चित्र निर्माण होऊ शकते.
तुमचा पगार, बँक बॅलन्स किंवा कर्जाची माहिती लगेच देऊ नका. नात्याचा आधार पैशांऐवजी तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व असू द्या.
सुरुवातीला आपल्या कमतरता किंवा असुरक्षितता सांगण्यापेक्षा तुमच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करा. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.
या गोष्टी लपवणे म्हणजे खोटे बोलणे नाही, तर योग्य वेळेची प्रतीक्षा करणे आहे. एकदा विश्वास निर्माण झाला की या गोष्टी शेअर करणे सोपे होईल.
नात्यात पारदर्शकता हवी, पण ती योग्य वेळी असावी. २०२६ मध्ये तुमच्या नवीन नात्याची सुरुवात समजूतदारपणे आणि संयमाने करा!