Sameer Amunekar
वडील अनेकदा केवळ शिस्त लावण्यावर भर देतात पण मुलांशी संवाद साधणं विसरतात. यामुळे मुलं आपले विचार, भावना शेअर करायला घाबरतात.
सतत चुका दाखवणं आणि क्वचितच कौतुक करणं हे मुलांच्या आत्मविश्वासावर परिणाम करतं. त्यांना असं वाटू लागतं की वडिलांना आपल्याबद्दल समाधान नाही.
अनेक वडील प्रेम व्यक्त करत नाहीत, आलिंगन देणं, "आय लव्ह यू" म्हणणं टाळतात. त्यामुळे मुलांना एक प्रकारची भावनिक पोकळी जाणवते.
वडील जर आपले बालपण, चुकांची कहाणी, संघर्ष सांगितले नाहीत, तर मुलांना त्यांच्याशी रिलेट करता येत नाही. संवादाचा तो महत्त्वाचा पूल तुटतो.
"तुझा मित्र किती हुशार आहे", "मी तुझ्या वयात हे केलं होतं" अशा तुलनांमुळे मुलं निराश होतात आणि वडिलांपासून दूर जाऊ लागतात.
कामाच्या धावपळीत वडील मुलांसाठी वेळ काढत नाहीत, ना त्यांचं ऐकून घेतात. यामुळे मुलांना दुर्लक्षित वाटतं आणि संवाद संपतो.