Akshata Chhatre
मुलांसाठी त्यांचे वडील हे पहिले हिरो आणि रोल मॉडेल असतात. वडील जे करतात, मुलगा त्याचेच अनुकरण करतो.
दैनंदिन जीवनात अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या मुलगा आपल्या वडिलांकडून शिकतो आणि एक चांगला माणूस बनतो.
वडिलांचे वर्तन मुलाचे भविष्य आणि त्याचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात मोठी भूमिका बजावते.
जेव्हा मुलगा पाहतो की त्याचे बाबा आईशी प्रेमाने आणि आदराने बोलतात, तिला कामात मदत करतात आणि महत्त्वाच्या निर्णयांत तिची सल्ला घेतात, तेव्हा तो स्त्रियांचा आदर करायला शिकतो.
वडील ज्या पद्धतीने घराच्या आणि कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडतात, ते पाहून मुलगा स्वतः जबाबदार बनायला शिकतो.
सहसा मुलांना भावना दाबायला शिकवले जाते, पण वडिलांनी जर आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या, तर मुलगाही तेच शिकतो.
वडिलांनी मुलाला हे समजावून सांगितले पाहिजे की दुःख झाल्यास रडणे हे कमकुवतपणाचे लक्षण नाही. संवेदनशील असणे हे एका चांगल्या माणसाचे लक्षण आहे.