Akshata Chhatre
मुलाच्या संगोपनात आई आणि वडील दोघांचीही भूमिका महत्त्वाची असते, मात्र काही विशिष्ट मूल्यं आणि सवयी अशा असतात ज्या मुलगा विशेषतः आपल्या वडिलांकडून शिकतो.
एक वडील म्हणून, तुम्ही जसे वागता, जसे निर्णय घेता आणि जसे इतरांशी संवाद करता त्याचं प्रत्यक्ष प्रतिबिंब तुमच्या मुलाच्या वर्तनात दिसून येते.
मुलगा पाहतो की त्याचे वडील आपल्या आईशी, बहिणीशी किंवा इतर महिलांशी कसे बोलतात. त्या व्यक्तींचा त्यांनी आदर केला का?
सौम्य व संयमी भाषा वापरली का? याच गोष्टी मुलाच्या मनावर खोलवर ठसतात आणि त्याचं पुढचं वागणं ठरवत जातात.
वडील कठीण प्रसंगी कसे वागतात रागावतात का, की शांतपणे परिस्थिती हाताळतात हेही मूल बारकाईने पाहतं.