Shreya Dewalkar
गोव्याच्या बागायती पिकामध्ये काजू हे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते.
गोव्यात काजू लागवडीसाठी पोषक अशी माती व हवामान असल्यामुळे गोव्यात काजूचे पीक सुमारे 55 हजार 302 हेक्टर क्षेत्रावर असून वार्षिक उत्पादन 27 हजार 70 टन आहे.
गोव्यातील काजूचे प्रक्रिया व गुणवत्तेनुसार विविध प्रकारात वर्गीकरण करता येते. गोव्याच्या स्थानिक बाजारपेठात होलसेल दरात तुम्हाला काजूचे प्रकार मिळू शकतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते खरेदी करू शकता.
यात तुम्हाला पांढऱ्या रंगात अखंड व मोठा काजू मिळतो. हा काजू तुम्हाला सर्वच दुकानात सहज उपलब्ध होतो.
यात तुम्हाला काजू अर्धे दोन तुकड्यांच्या स्वरुपात मिळतो. ह्या पद्धतीचा काजू तुम्ही बिर्याणी, ग्रेव्हीच्या डिश मध्ये हा काजू वापरता येतो.
यात लहान किंवा बारीक तुटलेले काजूचे तुकडे या स्वरुपात मिळतो. लहान काजूचे तुकडे तुम्ही स्वीट डिश मध्ये घालता येतात.
भाजलेले काजूंना चवीसाठी मीठ घालून शिजवलेले जातात.
यात काजूला लसुण, मिरची, तिखट, किंवा मध ही चव वापरून हे फेल्वर्ड काजू तयार केले जातात.
काजू बटर हे सर्वसाधारण पीनट बटरप्रमाणेच असते.
बेकिंग व पदार्थांसाठी लेप म्हणून वापरण्यात येणारे बारीक चिरलेले काजू.