Ashutosh Masgaunde
इरफान पठाण हा भारतासाठी पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा एकमेव भारतीय गोलंदाज आहे.
29 जानेवारी 2006 पासून कराचीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याची इतिहासात इरफान पठाणने हॅट्ट्रिक केल्यामुळे नोंद झाली.
गांगुलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याने पहिल्या डावातील पहिले षटक टाकण्यासाठी चेंडू इरफान पठाणकडे दिला. आणि इफानने इतिहास घडवला.
या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर एक धाव झाली, पण त्यानंतर इरफानने चौथ्या चेंडूवर सलमान बट, पाचव्या चेंडूवर युनूस खान आणि सहाव्या चेंडूवर मोहम्मद युसूफला शून्यावर क्लीन बोल्ड केले.
यासह पाकिस्तानविरुद्ध त्यांच्याच भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक विकेट घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला.
इरफान पठाण व्यतिरिक्त, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा एकही गोलंदाज नाही ज्याने कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक विकेट घेण्याचा पराक्रम केला असेल.
हा विक्रम गेल्या 18 वर्षांपासून इरफान पठाणच्या नावावर आहे.