Pranali Kodre
कोणत्याही कामासाठी शरिरातील उर्जा महत्त्वाची असते. शरिरातील ही उर्जा टिकवून ठेवण्यासाठी काही छोट्या सवयी आहे, ज्या आपल्याला मदत करू शकतात.
शारिरीक आणि मानसिक उर्जा टिकवून ठेवण्यासाठी पुरेझी झोप महत्त्वाची असते. पुरेशी झोप न घेतल्यास थकवा जाणवू शकतो.
योग्य आणि पोषक आहारामुळे तुम्हाला अधिक उर्जा मिळते.
भरपूरपेक्षा योग्य प्रमाणात आणि नियमित अंतराने पाणी पिल्याने डिहायड्रेशनची समस्या बऱ्याचदा जाणवत नाही. तसेच आपली उर्जाही टिकून राहते.
रोज नियमित व्यायाम केल्याने दिवसभर ताजेतवाणे राहण्यास मदत मिळते.
दिवसभराच्या कामाचे योग्य नियोजन केल्यास गोंधळ होत नाही आणि त्यामुळे आपण आपली शरिरातील उर्जाही वाचवू शकतो.
अर्थपूर्ण संवाद तुम्हाला नवीन गोष्टी करण्याची उर्जा देते, तसेच तुमच्यावरील तणाव दूर करतो.