Manish Jadhav
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होणे सामान्य झाले आहे. यामुळे अनेक समस्या उद्भवतात.
शरीरातील रक्ताची पातळी कमी होणे, अशा अनेक समस्यांपैकी आहे. खासकरुन महिलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते.
आज (12 डिसेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत.
दररोज बीट खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. बीट हे रक्ताच्या पातळीतील कमतरता भरुन काढण्यास मदत करते.
पालकमध्ये व्हिटॅमिन के आणि लोह मुबलक प्रमाणात असते. यामुळे रक्ताची पातळी सुधारते.
डाळिंब हे रक्तनिर्मितीसाठी खूप फायदेशीर आहे.
सफरचंद हे रक्त वाढवण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
खजूर रोज खाल्ल्यास शरीरातील लोहाची पातळी वाढण्यासोबतच रक्तदाब नियंत्रित राहतो.