Manish Jadhav
मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात, ज्याचा शारीरिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम होतो.
मासिक पाळीदरम्यान महिलांना पोटदुखी, थकवा, मूड बदलणे इत्यादी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
आज (11 डिसेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून मासिक पाळीदरम्यान कोणते पदार्थ खाणे टाळावे याविषयी जाणून घेणार आहोत.
रिफाइंड साखरेमुळे मूड बदलतो आणि रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होतो. त्यामुळे तुम्ही तूप किंवा गुळापासून बनवलेल्या मिठाई खावू शकता.
चिप्समध्ये जास्त प्रमाणात मीठ असते, ज्यामुळे पोटात सूज आणि वेदना वाढू शकतात.
चहा-कॉफीच्या अतिसेवनामुळे डोकेदुखी होऊ शकते.
व्हाईट ब्रेडमध्ये ग्लूटेन असते, ज्यामुळे इस्ट्रोजेन हार्मोन्समध्ये असंतुलन होऊ शकते.
मसालेदार अन्नामुळे पोटात जळजळ आणि अस्वस्थता वाढू शकते. मसालेदार अन्न पूर्णपणे सोडून देण्याऐवजी, प्रमाण नियंत्रित करा.