Manish Jadhav
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी इस्लामच्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
युरोपमध्ये इस्लामचा प्रचार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे मेलोनी यांनी म्हटले. विशेष म्हणजे, हे युरोपियन मूल्यांच्या विरुद्ध असल्याचेही यावेळी बोलताना मेलोनी यांनी नमूद केले.
मेलोनी यांनी सौदी अरेबियावरही गंभीर आरोप केले. सौदी अरेबिया इटलीतील इस्लामिक सांस्कृतिक केंद्रांना आर्थिक मदत करत असल्याचे मेलोनी यांनी म्हटले. सौदीबाबत मेलोनी म्हणाल्या की, त्यांच्या देशात शरिया कायदा लागू आहे.
मेलोनी म्हणाल्या की, ''इस्लामिक संस्कृतीची विशिष्ट व्याख्या आहे. मात्र, आमच्या सभ्यतेच्या मूल्यांसाठी ही व्याख्या एक समस्या आहे. इटलीतील बहुतांश इस्लामिक सांस्कृतिक केंद्रांना सौदी अरेबिया आर्थिक मदत करत आहे हे लपून राहिलेले नाही.''
आपल्या प्राधान्यक्रमांची यादी करताना मेलोनीने इस्लामिक दहशतवादावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी मुस्लिम स्थलांतरितांना इटलीसाठी धोका असल्याचे वर्णन केले.
जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. मेलोनी 2008 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी इटलीची सर्वात तरुण मंत्री बनल्या. चार वर्षांनंतर, म्हणजे 2012 मध्ये, त्यांनी ब्रदर्स ऑफ इटली पार्टीची स्थापना केली.
जॉर्जिया मेलोनी यांच्यावर एलजीबीटी विरोधी असल्याचा आरोप होतो. मात्र, त्या हे आरोप फेटाळून लावतात.
पुतीन यांना भेटण्यासाठी आपल्याकडे वेळ नसल्याचे मेलोनी यांनी म्हटले होते. त्यांनी नाटोला पाठिंबाही दर्शवला. जॉर्जिया मेलोनी युक्रेनला पाठिंबा देऊ शकतात, परंतु त्यांच्या युतीतील दोन्ही पक्षांचा कल रशियाकडे अधिक आहे.