Manish Jadhav
गोव्यातलं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ तर पाडतच, पण इथली न्यारी दुनियाही पर्यटकांना आकर्षित करते.
तुम्हाला तुमच्या गोवा ट्रीपमध्ये थ्रील करायचा असेल तर तुम्ही इथल्या जलक्रिडांचा अनुभव नक्की घेतला पाहिजे.
गोवा तुम्हाला कधीच निराश करत नाही. गोव्याचा खूशनूमा माहोल तुमची ट्रीप यादगार बनवतो. इथल्या निसर्ग सौंदर्याबरोबरच इथला पार्टी माहोल तुम्हाला चंदेरी दुनियेचा अनुभव देऊन जातो.
गोवा ट्रीपमध्ये तुम्ही इथल्या क्लब्सना नक्की भेट दिली पाहिजे. गोव्यातल्या सर्वात जुन्या क्लबपैकी एक टिटो क्लबला तुम्ही नक्की भेट देऊ शकता. याशिवाय, क्युबाना, एलपीके वॉटरफ्रंट क्लबही प्रसिद्ध आहेत.
गोव्यात गेलात आणि तुम्ही क्रूझ सफरीचा आनंद घेतला नाही असं बिलकुल करु नका. मांडवीतील यादगार क्रूझ सफर तुम्हाला 'जन्नत'चा अनुभव देऊन जाते.
गोव्याला भेट देणारा गोव्याच्या प्रेमात पडतो. गोव्यातलं निसर्ग सौंदर्य तर भुरळ पाडतचं पण इथे तुमच्या मनाच्या तारा 'दिल से दिल तक' छेडून जातात.