Manish Jadhav
मराठा साम्राज्याचे वारसदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने अनेक प्रयत्न केले. यासाठी त्याने एक मोठा सापळा रचला.
संभाजी महाराज हे कोकणातील संगमेश्वर येथे एका मोहिमेवर होते. त्यांच्यासोबत त्यांचे खास सरदार आणि मित्र कवी कलश होते. या ठिकाणी ते विश्रांती घेत असताना अचानक शत्रूंनी हल्ला केला.
औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान याने गुप्त माहितीच्या आधारावर संगमेश्वरवर अचानक हल्ला केला. मराठा सैन्य या अनपेक्षित हल्ल्यासाठी तयार नव्हते.
अचानक हल्ला झाला असतानाही संभाजी महाराज आणि कवी कलश यांनी मोठ्या शौर्याने मुघल सैन्याचा सामना केला. त्यांच्या सैनिकांची संख्या खूप कमी असूनही त्यांनी शेवटपर्यंत कडवा प्रतिकार केला.
संभाजी महाराजांना त्यांच्या काही सरदारांनी फितुरीमुळे धोका दिला. त्यांनी मुघलांना महाराजांच्या ठिकाणाची माहिती दिली. यामुळे मुघल सैन्याने त्यांना मोठ्या संख्येने घेरले.
तीव्र प्रतिकार करुनही संख्याबळापुढे त्यांचा निभाव लागला नाही आणि मुघलांनी अखेर संभाजी महाराजांना कैद केले. त्यांच्यासोबत कवी कलश यांनाही पकडण्यात आले.
औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांचा अमानुष छळ केला. त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची अट घालण्यात आली. पण संभाजी महाराजांनी आपला धर्म आणि स्वाभिमान सोडला नाही.
औरंगजेबाने केलेला अमानुष छळ सहन करुनही आपल्या धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी त्यांनी दिलेले बलिदान अतुलनीय होते. म्हणूनच त्यांना ‘धर्मवीर’ ही उपाधी मिळाली आणि ते इतिहासात अजरामर झाले.