Honda Elevate: बंपर ऑफर! क्रेटा अन् विटाराला टक्कर देणाऱ्या होंडा एलिवेटवर मिळतेय 122000 लाखांची सूट

Manish Jadhav

होंडाचा 'ग्रेट इंडिया फेस्ट'

होंडा कार्स इंडियाने आपल्या गाड्यांवर 'ग्रेट इंडिया फेस्ट' अंतर्गत मोठी सूट जाहीर केली आहे. ग्राहकांना या ऑफरमध्ये तब्बल 1.22 लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.

honda elevate | Dainik Gomantak

सर्वात जास्त सूट

होंडा सिटी (City) आणि अमेज (Amaze) या गाड्यांवरही सूट मिळत असली तरी सर्वात जास्त सूट मिड साईज एसयूव्ही होंडा एलिवेट (Elevate) वर दिली जात आहे.

honda elevate | Dainik Gomantak

एलिवेटवर 1.22 लाखांची सूट

कंपनीकडून एलिवेटवर 1.22 लाख रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट दिला जात आहे. ही ऑफर फक्त ऑगस्ट महिना संपेपर्यंतच लागू असेल.

honda elevate | Dainik Gomantak

हुंडई क्रेटाला टक्कर

होंडा एलिवेट ही भारतीय बाजारात हुंडई क्रेटा, किआ सेल्टोस आणि मारुती ग्रँड विटारा सारख्या गाड्यांना टक्कर देते. मात्र, विक्री कमी असल्याने कंपनीने ही ऑफर आणली आहे.

honda elevate | Dainik Gomantak

दमदार फिचर्स

एलिवेटमध्ये एडीएएस (ADAS) सारखे आधुनिक सुरक्षा फिचर्स आहेत.

honda elevate | Dainik Gomantak

इंजिन आणि मायलेज

एलिवेटमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिनचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये टर्बो-पेट्रोल, हायब्रिड किंवा डिझेलचा पर्याय नाही. ही गाडी मॅन्युअलमध्ये 15.31 किमी प्रति लीटर आणि ऑटोमॅटिक (CVT) मध्ये 16.92 किमी प्रति लीटरचा मायलेज देते.

honda elevate | Dainik Gomantak

वाढती मागणी

जून महिन्यात होंडा एलिवेटच्या मागणीत 56.25 टक्क्यांची मासिक वाढ दिसून आली आहे. यावरुन ही कार ग्राहकांमध्ये हळूहळू लोकप्रिय होत असल्याचे दिसते.

honda elevate | Dainik Gomantak

सूटबद्दल अधिक माहितीसाठी

डिस्काउंट ऑफरबद्दल अधिक आणि अचूक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या होंडाच्या अधिकृत डिलरशीपमध्ये (Dealership) संपर्क साधू शकता.

honda elevate | Dainik Gomantak

Prabalgad Fort: शिवाजी महाराजांनी जिंकलेला 'मुरंजन' गड; आजही देतो मराठा स्थापत्यकलेची साक्ष

आणखी बघा