Manish Jadhav
भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सध्या कमालीचे ताणले गेले आहेत. मालदीवचे चीनधार्जिणे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांनी आतापर्यंत भारताचा कडाडून विरोध केला.
मात्र आता मोइज्जू यांची हुकूमशाही वृत्ती देशातही समोर येत आहे. त्यांनी विरोधी पक्षांना संसदेत येण्यापासून रोखले.
चार मंत्रिमंडळ सदस्यांबाबत विरोधकांची मान्यता न मिळाल्याने मालदीवच्या संसदेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. खासदारांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीदरम्यान मुइज्जू यांच्या खासदारांची दादागिरी पाहायला मिळाली.
यातच आता विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की, मोइज्जू यांच्या विरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. विशेष म्हणजे, ते लवकरच त्यांच्याविरोधात मोठी कारवाई करणार आहेत.
मुइज्जू आणि भारत आमनेसामने आल्यापासून मालदीवमधील विरोधक सत्तेसाठी अधिक आक्रमक दिसत आहेत. गेल्या वर्षी 17 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष बनताच चीन समर्थक मुइज्जू यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली.
मोइज्जू यांनी भारताला मालदीवमधून आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले होते. त्यामुळेच मालदीवच्या जनतेने त्यांना जनादेश दिला असल्याचे ते म्हणाले.
मोइज्जू यांनी भारताला मालदीवमधून आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले होते. त्यामुळेच मालदीवच्या जनतेने त्यांना जनादेश दिला असल्याचे ते म्हणाले.