Israel-Hamas War: हमासचा अंत, नेतन्याहूंचे ध्येय

Manish Jadhav

इस्रायल आणि हमास युद्ध

इस्रायल आणि हमास यांच्यात अनेक दिवसांपासून युद्ध सुरु आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या 26 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अमेरिकन अधिकारी युद्ध संपवण्याबरोबरच ओलिसांच्या सुटकेवर जास्त जोर देत आहेत.

Israel Hamas War | Dainik Gomantak

हमासचा खात्मा

इस्रायलचे म्हणणे आहे की, सर्व समस्यांवर हमासचा खात्मा हाच एकमेव उपाय आहे. पंतप्रधानांसह इस्रायलच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी हमासचा खात्मा होईपर्यंत गप्प बसणार नाही, अशी शपथ अनेक वेळा घेतली आहे.

Israel Hamas War | Dainik Gomantak

नेतन्याहू यांनी हिटलरच्या आत्मचरित्राची प्रत दाखवली

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ॲडॉल्फ हिटलरच्या 'माइन काम्फ' या आत्मचरित्राची अरबी प्रत दाखवली.

Israeli Prime Minister Benjamin Netanyahu | Dainik Gomantak

नेतन्याहू म्हणाले

नेतन्याहू म्हणाले की, हे पुस्तक इस्रायली सैनिकांनी गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांच्या घरातून जप्त केले आहे. जेव्हा इस्रायल गाझामधील दहशतवाद्यांचा खात्मा करेल, तेव्हा सेमिटिक विरोधी विचारसरणीचाही अंत होईल.

Israeli Prime Minister Benjamin Netanyahu | Dainik Gomantak

पुन्हा एकदा नरसंहार

जर आपण नवीन नाझी म्हणजेच हमासच्या दहशतवाद्यांना संपवले नाही तर पुन्हा एकदा नरसंहार होऊ शकतो. गुप्तचर संस्थेचे संचालक विल्यम बर्न्स ओलिसांच्या सुटकेबाबत बोलण्यास तयार आहेत.

Israeli Prime Minister Benjamin Netanyahu | Dainik Gomantak

संरक्षण क्षेत्र अधिक मजबूत करण्यासाठी...

नेतन्याहू पुढे म्हणाले की, मी माझ्या संरक्षण आणि अर्थ मंत्र्यांना अशी योजना बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे आपले संरक्षण क्षेत्र अधिक मजबूत होईल.

Israeli Prime Minister Benjamin Netanyahu | Dainik Gomantak

इस्रायलने सडकून टीका केली

नेतन्याहू यांनी एक दिवस आधी आलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयावरही सडकून टीका केली. आम्ही आमच्या नागरिकांच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत, असे शुक्रवारी नेतन्याहू यांनी म्हटले होते.

Israeli Prime Minister Benjamin Netanyahu | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी