Manish Jadhav
गेल्या काही दशकांमध्ये क्रेडिट कार्डचा वापर झपाट्याने वाढला आहे. याचा प्रूफ आरबीआयच्या अहवालात स्पष्टपणे देण्यात आला आहे.
या अहवालानुसार, गेल्या ५ वर्षांत क्रेडिट कार्डची संख्या दुप्पट झाली आहे. आता त्याची संख्या अंदाजे 10.80 कोटींवर पोहोचली आहे. तर डेबिट कार्डची संख्या स्थिर राहिली आहे.
अहवालानुसार, डिसेंबर 2019 मध्ये 5.53 कोटी क्रेडिट कार्ड होते, तर डिसेंबर 2024 मध्ये ही संख्या 10.80 कोटी झाली आहे. डेबिट कार्डबद्दल बोलायचे झाल्यास, डिसेंबर 2019 मध्ये त्यांची संख्या 80.53 कोटी होती. डिसेंबर 2024 मध्ये ती वाढून 99.09 कोटी झाले.
गेल्या दशकात भारतात डिजिटल पेमेंटमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. 2013 मध्ये एकूण 222 कोटी डिजिटल व्यवहार झाले होते. एकूण रक्कम 772 लाख कोटी रुपये होती. तर 2024 मध्ये ही संख्या 20,787 कोटी व्यवहार आणि 2,758 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल.
सीमापार पेमेंट सुधारण्यासाठी इतर देशांच्या जलद पेमेंट सिस्टमशी UPI जोडण्याचे काम करत असल्याचेही RBI ने म्हटले आहे. भारत आणि सिंगापूरमधील UPI आणि PayNow फेब्रुवारी 2023 मध्ये जोडले गेले. याशिवाय, आता भूतान, फ्रान्स, मॉरिशस, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका आणि यूएई सारख्या देशांमध्ये भारताच्या UPI अॅप्सद्वारे QR कोड पेमेंट करता येईल.