सजग पालकत्वाचा कानमंत्र कोणता? वाचा इथे..

गोमन्तक डिजिटल टीम

अनेक गोष्टी

मुले वाढत असताना त्यांच्या आजूबाजूला असलेली कौटुंबिक संस्कृती, दैनंदिन वातावरण आणि काही वेगळ्या सवयींची सातत्यपूर्ण अंमलबजावणी यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.

चीअरलीडर

चुकांवर सकारात्मकतेने मात करण्यास शिकवावे आणि मुलांचे ‘चीअरलीडर’ होण्याचा प्रयत्न करावा.

नवीन आव्हाने

साहसी सहल ही मुलांना त्यांच्यातील क्षमतांची जाणीव करून देते. अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी, नवीन आव्हानांवर मात करण्यासाठी मुले तयार होतात

आत्मपरीक्षण

मुलांनी अशा प्रकारे आत्मपरीक्षण करावे असं तुम्हाला वाटत असेल, तर मुलांना मोकळेपणाने, त्यांना चिंतन करण्यास भाग पाडतील असे प्रश्न विचारा.

सकारात्मक आठवणी

छोट्या-छोट्या आठवणींमधून अनेक सकारात्मक गोष्टी वाढीस लागतात. यासाठी मुलांच्या स्मरणात राहतील अशा गोष्टी करा

घट्ट नाते

या सर्व गोष्टी तुमचे आणि मुलांचे नाते अधिक घट्ट करेल आणि त्याचे रूपांतर मैत्रीत होईल.

स्वतःवर विश्वास

मुलांच्या कमकुवतपणापेक्षा त्यांचे सामर्थ्य आणि चांगुलपणावर अधिक लक्ष केंद्रित करावे. योग्य तिथे योग्य तेवढे कौतुक केल्याने त्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्यास मदत होते

सावधान! मोरांच्या अधिवासात होतोय बदल? देत आहेत धोक्याची सूचना..