गोमन्तक डिजिटल टीम
मानवी हस्तक्षेप वाढल्याने पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे.
एरवी जमिनीवर अन् झाडांवर राहणारा मोरासारखा पक्षी साडेसहा हजार फूट उंचीवर गेल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.
उत्तराखंडमध्ये बागेश्वर आणि काफलीगेर वनक्षेत्रात हा पक्षी ठराविक उंचीवर आढळून आला होता.
मोराच्या वर्तनात झालेला हा बदल खरोखरच आश्चर्यकारक म्हणावा लागेल.
हा पक्षी साधारणपणे समुद्रसपाटीपासून दीड हजार फूट उंचीवर राहणे पसंत करतो.
जैवविविधता धोक्यात आल्यामुळे तो साडेसहा हजार फूट उंचीवर गेल्याचे आढळून आले आहे.
उंचावरील वातावरण पक्ष्यांच्या अधिवासासाठी अधिक पोषक असते.
प्रतिकूल हवामानामुळे हा बदल होतो आहे. या सगळ्या बदलांचा गांभीर्याने विचार करून त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे.
कधी होणार पणजी 'स्मार्ट'? 'या' समस्येचं काय करणार?