अफजलखानाच्या वधानंतर छत्रपतींनी जिंकलेला अन् बाजीप्रभूंच्या बलिदानाने पावन झालेला 'विशालगड'

Manish Jadhav

विशालगड

विशालगड हा मराठा साम्राज्यातील एक अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता. या किल्ल्याने अनेक ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत.

Vishalgarh Fort | Dainik Gomantak

छत्रपतींनी जिंकला

या किल्ल्याला 'खेळणा' असेही म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1659 मध्ये अफजलखानाचा वध केल्यानंतर जिंकला होता. विशेष म्हणजे, जिंकल्यानंतर त्याचे नाव बदलून 'विशालगड' केले होते.

Vishalgarh Fort | Dainik Gomantak

वेढ्यातून सुटका

सिद्धी जोहरच्या वेढ्यातून बाहेर पडल्यानंतर शिवाजी महाराजांनी विशालगडाकडे कूच केली होती.

Vishalgarh Fort | Dainik Gomantak

बाजिप्रभू देशपांडे यांचा पराक्रम

शिवाजी महाराजांना सुखरुप विशालगडावर पोहोचवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या 300 सैनिकांसह पावनखिंडीत सिद्धीच्या सैन्याला थोपवून धरले होते. या थरारक लढाईत बाजीप्रभू शहीद झाले होते.

Vishalgarh Fort | Dainik Gomantak

किल्ल्याची भौगोलिक रचना

हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत सुमारे 3500 फूट उंचीवर आहे. विशालगड कोल्हापूर जिल्ह्यापासून सुमारे 76 किलोमीटरवर आहे.

Vishalgarh Fort | Dainik Gomantak

प्रमुख ठिकाणे

किल्ल्यावर एक प्राचीन मंदिर आहे, ज्याला सध्या 'अमृतईचा दर्गा' म्हणून ओळखले जाते. किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळाही आहे, जो त्यांच्या पराक्रमाची आठवण करुन देतो.

Vishalgarh Fort | Dainik Gomantak

किल्लेदाराची कामगिरी

छत्रपतींच्या काळात धनाजी जाधव यांसारख्या विश्वासू सरदारांनी या किल्ल्याचे रक्षण केले. महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यावर त्याला एक स्वतंत्र किल्लेदार नेमून त्याची व्यवस्था केली.

Vishalgarh Fort | Dainik Gomantak

सध्याची स्थिती आणि पर्यटन

आज विशालगड एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. येथे जाण्यासाठी कोल्हापूर किंवा मलकापूरमार्गे बस किंवा खासगी वाहनाने जाता येते. गडावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे.

Vishalgarh Fort | Dainik Gomantak

Lohagad Fort: सह्याद्रीच्या कुशीतला 'विंचूकाटा' किल्ला! शिवकालीन सामर्थ्याचं प्रतीक

आणखी बघा