Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अनेक महत्त्वाचे किल्ले होते. यापैकीच एक तिकोना हा किल्ला होता. पुणे-लोणावळा मार्गावर हा किल्ला आहे.
किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे त्याला 'तिकोना' असे नाव पडले असले, तरी शिवाजी महाराजांनी त्याचे नामकरण 'वितंडगड' असे केले होते.
11 जून 1665 रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांना दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता.
पुरंदरच्या तहात किल्ला मोगलांना दिला असला, तरी 1670 च्या सुमारास मराठ्यांनी तो पुन्हा जिंकून स्वराज्यात आणला.
तिकोना किल्ल्याच्या मोक्याच्या ठिकाणामुळे महाराजांना संपूर्ण मावळ प्रदेशावर देखरेख ठेवणे सोपे होते.
1660 मध्ये या किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सरनौबत नेताजी पालकर यांची नेमणूक केली होती.
पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात, औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर काही काळ तिकोना किल्ल्यावर राहिला होता.
लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांच्या जवळ असल्याने तिकोना किल्ल्याला ऐतिहासिकदृष्ट्या मोठे लष्करी महत्त्व होते.
किल्ल्याच्या महत्त्वामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याच्या संरक्षणाची विशेष काळजी घेतली होती. तसेच, परिसरातील इतर किल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला एक महत्त्वाचे ठिकाण होता.