Manish Jadhav
इंग्लंड दौऱ्यावर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून शुभमन गिल याची पहिलीच कसोटी होती. या दौऱ्यात त्याने आपल्या नेतृत्व आणि फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली.
गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. यामुळे त्याच्या नेतृत्वाचे कौतुक होत आहे.
गिलच्या नेतृत्वाखाली भारताने या दौऱ्यात दोन कसोटी सामने जिंकले. या कामगिरीच्या जोरावर तो कपिल देव, सौरव गांगुली आणि सुनील गावस्कर यांसारख्या दिग्गज कर्णधारांच्या पंक्तीत जाऊन बसला.
या मालिकेत गिलने पाच सामन्यांमध्ये 75.40 च्या सरासरीने एकूण 754 धावा काढल्या. यामध्ये त्याने चार शतके झळकावली.
तसेच, या दौऱ्यात गिलने ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ हे दोन्ही पुरस्कार जिंकले. इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून हे दोन्ही पुरस्कार जिंकणारा तो विराट कोहलीनंतरचा दुसरा भारतीय कर्णधार ठरला.
गिलने दबावात शांत राहून योग्य रणनीती आखली. तसेच, युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समन्वय साधण्यात तो यशस्वी ठरला.
हा दौरा गिलच्या कारकिर्दीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. त्याने भविष्यातील भारतीय क्रिकेटसाठी चांगले संकेत दिले.
या दौऱ्याने गिल केवळ एक चांगला फलंदाजच नाहीतर एक उत्कृष्ट कर्णधार देखील आहे, हे सिद्ध केले.