Akshay Nirmale
५४ व्या इफ्फी च्या संवाद सत्रात अभिनेत्री विद्या बालनने तिच्या बेधकड, बिनधास्त मतांनी सर्व प्रेक्षकांना आपलेसे केले.
यावेळी विद्याने महिलांनी बॉडी शेमिंगला फाट्यावर मारा, असा सल्ला दिला. तसेच पुरूषांनीही महिलांना या चष्म्यातून पाहू नये, असेही ती म्हणाली.
महिलांनी आधी स्वतःला स्विकारले पाहिजे. एकदा आपणच आपल्याला आवडू लागलो की, मग कुठल्या गोष्टीचे वाईट वाटत नाही, असे ती म्हणाली.
माझ्यातील नकारात्मकता संपली आहे. मी मला जशी आहे तशी स्विकारले आहे. त्यामुळेच मी आनंदी आहे, असेही विद्या म्हणाली.
महिला प्रधान चित्रपट करायची इच्छा पूर्ण झाली, असेही विद्याने यावेळी सांगितले.
टीव्हीवरील हम पाँच या मालिकेतून विद्याने करीयरची सुरवात केली होती. तेव्हापासून ते बॉलीवूडमध्ये चौथा खान असे बिरूद मिळविण्यापर्यंत तिने प्रगती केली.
विद्या बालनची एकूण संपत्ती १३६ कोटी रूपये इतकी आहे, असे समजते.