Pranali Kodre
प्रत्येक 4 वर्षांच्या अंतराने लीप वर्ष येते. म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातील एक दिवस वाढून 29 तारीख येते.
याच 29 फेब्रुवारीला लीप डे म्हटले जाते. प्रत्येक 4 वर्षांनी ही तारीख येत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की 29 फेब्रुवारी 2024 रोजी म्हणजेच लीप डे ला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात वेलिंग्टनला कसोटी सामना सुरू झाला आहे. हा लीप डेला सुरू झालेला अवघा सहावाच कसोटी सामना आहे.
साल 1968 मध्ये पहिल्यांदाच 29 फेब्रुवारीला कसोटी सामन्याची सुरुवात झाली होती. 1968 साली न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पहिल्यांदा लीप डे कसोटी सामना वेलिंग्टनला खेळवला गेला होता.
1968 सालीच 29 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघात ब्रिजटाऊनला कसोटी सामना सुरू झाला होता.
त्यानंतर 1980 साली 29 फेब्रुवारीला न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ऑकलंडला कसोटी सामना सुरू झाला होता.
29 फेब्रुवारी 2008 रोजी बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात चितगावला कसोटी सामना सुरू झाला होता.
यानंतर 2020 साली देखील 29 फेब्रुवारी रोजीच न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील कसोटी सामन्याला सुरूवात झाली होती.