या दिग्गजांच्या नावे आहे, सलग 100 कसोटी खेळण्याचा विक्रम

Ashutosh Masgaunde

सर एलिस्टर कूक

इंग्लंडचा माजी कर्णधार एलिस्टर कूकने 2006 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 2018 पर्यंत इंग्लडने खेळलेल्या सर्व 159 सामन्यांमध्ये त्याने प्रतिनिधित्व केले होते.

Alastair Cook | Dainik Gomantak

एलन बॉर्डर

ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू एलन बॉर्डर यांनी 1979 ते 1994 या कालावधीत सलग 153 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Allan Border | Dainik Gomantak

मार्क वॉ

ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज आणि उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक मार्क वॉ याने 1993 ते 2002 या कालावधीत सलग 107 कसोटी सामने खेळले आहेत.

Mark Waugh | Dainik Gomantak

सुनील गावसकर

लिटल मास्टर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या सुनील गावसकर यांनी 1975 ते 1987 या कालावधीत सलग 106 कसोटी सामने खेळण्याची कामगिरी केली आहे. यामध्ये त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावे केले.

Sunil Gavaskar | Dainik Gomantak

ब्रॅंडन मॅक्कूलम

न्यूझीलंडा धडाकेबाज फलंदाज ब्रॅंडन मॅक्कूलम याने 2004 ते 2016 या 12 वर्षांच्या काळात सलग 101 कसोटी सामने खेळले आहेत.

Brendon Mccullum | Dainik Gomantak

नॅथल लायन

ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या एशेस सामन्यात आपल्या कारकिर्दीतील सलग 100 वा सामना खेळत आहे.

Nathan Lyon | Dainik Gomantak

नॅथन लायनची कामगिरी

गेल्या काही वर्षात लायन ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचा फिरकी गोलंदाज आहे. त्याने दिग्गज शेन वॉर्नची पोकळी भरून काढत दमदार कामगिरी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nathan Lyon | Dainik Gomantak
अधिक वाचण्यासाठी...