Manish Jadhav
आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. दरम्यान तेलंगणाचे CM रेवंत रेड्डी यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.
मुख्यमंत्री रेड्डी यांनी शुक्रवारी निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना सापाशी केली.
रेवंत रेड्डी यांनी डिसेंबर 2021 मध्ये मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांचा उल्लेख केला. यासोबतच त्यांनी नरेंद्र मोदींना 'काळा साप' म्हटले. हा काळा साप असा आहे की, जो निवडणुक जिंकल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना चावायला येईल.
रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे पहिले काँग्रेस मुख्यमंत्री आहेत. तेलंगणामध्ये 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली.
रेवंत रेड्डी मुख्यमंत्री बनले. रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेसने मोठा विजय मिळवला. मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते खासदार आणि तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष होते.
जून 2021 मध्ये त्यांना तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी रेवंत रेड्डी हे टीडीपीचे मोठे नेते होते. ते मलकाजगिरीचे खासदार होते.