Sameer Panditrao
भारतातील, भारताबाहेरील पर्यटकांना गोवा नेहमीच आकर्षित करत आला आहे.
गोव्यातील बिचेस, नाईट लाईफ, क्रुझ सफरीचा आपण आनंद घेतला असेलच.
गोव्याचा ग्रामीण भाग असाच खास आणि निसर्गाने नटलेला आहे.
गोव्यातील हे एक सुंदर गाव आहे.
हळदोणा येथील तीन मानोस परिसर खूपच सुंदर आहे.
येथे नदीकाठी कायम शांतता असते.
या प्रवाहावरील पूल लोकांना आवडतो, फोटो काढायला गर्दी होते.