Sameer Amunekar
ऑरेंज रंगाचा टेडी बियर आनंद, उत्साह आणि मैत्रीचे प्रतीक मानला जातो. एखाद्या व्यक्तीला तो तुमच्या आयुष्यात किती खास आहे, हे व्यक्त करण्यासाठी भेट देऊ शकता.
हिरवा रंग ताजेपणा, नव्या सुरुवाती, समृद्धी आणि शांततेचे प्रतीक आहे. तुम्ही प्रेम व्यक्त करण्यासाठी हिरव्या रंगाचा टेडी बेअर गिफ्ट द्या.
तुमच्या खास व्यक्तीला वचन द्यायचं असेल आणि नात्यात कमिटमेंट दाखवायची असेल तर निळ्या रंगाचा टेडी बेअर द्या.
गुलाबी रंग मैत्रीचं प्रतीक आहे. प्रेमाचा प्रस्ताव स्विकारला आहे हे कुणाला सांगायचं असेल तर गुलाबी रंगाचा टेडी भेट म्हणून द्या.
लाल रंग प्रेमाचं प्रतीक आहे. प्रेम आणि पॅशनचे प्रतीक असलेल्या लाल रंगाच्या टेडीच्या सहाय्याने तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता हे सांगा.