Sameer Panditrao
टेडी बिअरच्या निर्मितीची कथा मजेशीर आहे.
१९०२ मध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट शिकारीच्या प्रवासावर होते, तेव्हा रुझवेल्टने झाडाला बांधलेल्या अस्वलाच्या पिल्लाला गोळी मारण्यास नकार दिला.
ही घटना इतकी प्रसिद्ध झाली की त्याचे राजकीय व्यंगचित्र काढले गेले.
राजकीय कार्टूनवरून प्रेरित होऊन ब्रुकलिन कँडी शॉपचे मालक मॉरिस आणि रोझ मिचटॉम यांनी १९०३ मध्ये टेडी बीअर तयार केले होते
रुझवेल्टने त्यांच्या स्टफड अस्वलाला "टेडीज बेअर" असे नाव देण्याची परवानगी दिली.
मिचटॉम्सनी आयडियल टॉय कंपनीची स्थापना केली
टेडी बिअर हे नाव जगभर प्रसिद्ध झाले आणि त्याचा खप वाढला.