Sameer Panditrao
प्रत्येकालाच समोरच्याने आपली किंमत करावी आणि आपली किंमत ओळखली जावी असे वाटते.
होणारे कौतुक आणि ते स्वीकारण्याची योग्य पद्धत हा तुमच्यातला आत्मविश्वास दाखवण्याचा अगदी सोपा मार्ग आहे.
तुमचे कोणी कौतुक केल्यावर फार मोठे उत्तर किंवा स्पष्टीकरण द्यायची गरज नसते. अगदी साधेपणाने सरळ आणि मनापासून आभार मानणे प्रभावी ठरते.
तुमचं कौतुक करणाऱ्याकडे बघून स्मितहास्य करा. ही लहानशी वाटणारी कृती आपल्या आत्मविश्वासाची ओळख करून देते आणि आपली प्रामाणिकता दाखवते.
कौतुक स्वीकारण्याची पहिली पायरी म्हणजे कौतुक न नाकारणे. त्यात काय एवढे’ असं म्हणणं टाळा. ज्यामुळे तुमच्या मेहनतीचे आणि तुमच्या कौतुकाचे मूल्य कमी होते.
तुमचे कौतुक ज्या गोष्टीमुळे होत असेल, त्यामध्ये इतरांचाही जर वाटा असेल तर सगळे कौतुक स्वतःकडे न ठेवता ‘यामध्ये सहकाऱ्यांचाही मोठा वाटा आहे’ असे प्रामाणिकपणे सांगणे योग्य ठरते.
कोणी तुमचे एखाद्या बाबतीत कौतुक केले, तर त्या ताकदीला पुढे अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न करा.