Pranali Kodre
भारतीय महिला संघाची माजी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिचा 25 नोव्हेंबर रोजी वाढदिवस असतो.
चकदा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणाऱ्या झुलनने वेगवान गोलंदाजीत तिची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.
भारतीय महिला संघाकडून जवळपास 20 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट झुलनने खेळले. तिने 2022 साली निवृत्ती घेतली.
झुलनने 2002 साली भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 कसोटी, 204 वनडे आणि 68 टी20 सामने खेळले. तिने कसोटीत 44 विकेट्स, वनडेत 255 विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 56 विकेट्स घेतल्या आहेत.
झुलन वनडेमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी मिताली राज नंतरची दुसरीच खेळाडू आहे.
त्याचबरोबर तिच्या नावावर वनडेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचाही विक्रम आहे. विशेष म्हणजे वनडेत 200हून अधिक विकेट्स घेणारी ती एकमेव महिला खेळाडू आहे.
झुलन महिला वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारीही खेळाडू असून तिने 34 वर्ल्डकप सामन्यांमध्ये 43 विकेट्स घेतल्या आहेत.
झुलनने 2008 ते 2011 दरम्यान भारतीय संघाचे नेतृत्वही केले.
झुलनला 2010 साली अर्जुन पुरस्कार आणि 2012 साली पद्मश्री पुरस्कारने गौरविण्यात आले होते.
झुलनने क्रिकेटमधून खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले आहे.