Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादला झालेल्या अंतिम सामन्यात 6 विकेट्सने पराभूत करत जिंकले.
वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या संघात मिचेल मार्शचाही समावेश होता.
त्यामुळे मिचेल आणि त्याचे वडील गॉफ मार्श ही पहिली पिता पुत्रांची जोडी ठरली आहे, ज्यांनी वनडे वर्ल्डकचा अंतिम सामनाही खेळला आणि वर्ल्डकप विजेतेपदही मिळवले.
गॉफ मार्श हे देखील ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू असून ते ऑस्ट्रेलियाने 1987 साली सर्वात पहिल्यांदा मिळवलेल्या वर्ल्डकप विजयात सामील होते.
विशेष म्हणजे मिचेल मार्श जेव्हा अहमदाबादला भारताविरुद्ध अंतिम सामना खेळत होता, तेव्हा गॉफ देखील स्टेडियममध्ये होते.
इतकेच नाही, तर 1987 सालच्या वर्ल्डकपचे सामने देखील भारतात झाले होते. अंतिम सामना कोलकातामधील ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला होता, तर आता 2023 मधील वर्ल्डकप देखील भारतात झाला. त्यामुळे मार्श पिता-पुत्रांनी भारतातच वर्ल्डकप जिंकला आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की 2015 सालच्या वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचाही मिचेल मार्श भाग होता, मात्र तो वर्ल्डकप ऑस्ट्रेलियामध्ये झाला होता. यंदा मात्र, मार्श पिता-पुत्रांनी एकाच देशात वर्ल्डकप जिंकण्याचा कारनामा केला आहे.
गॉफ मार्श यांनी भारतात झालेल्या 1987 सालच्या वर्ल्डकपमध्ये ८ सामन्यांत 61.14 च्या सरासरीने 428 धावा केल्या होत्या, ज्यात 2 शतकांचा समावेश होता.
तसेच मिचेलने 2023 वर्ल्डकपमध्ये 10 सामन्यांत 49 च्या सरासरीने 2 शतकांसह 441 धावा केल्या, तसेच त्याने 2 विकेट्स घेतल्या.