Pranali Kodre
भारतीय महिला क्रिकेट संघाने 16 डिसेंबर रोजी इंग्लंड महिला क्रिकेट संघाला नवी मुंबईत पार पडलेल्या एकमेव कसोटी सामन्यात तब्बल 347 धावांनी विजय मिळवला.
भारतीय संघाने मिळवलेला हा विजय महिलाच्या कसोटी क्रिकेट इतिहासात धावांच्या तुलनेतील सर्वात मोठा विजय ठरला.
भारतीय संघाने हा ऐतिहासिक विजय मिळवताना 25 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.
यापूर्वी महिलांच्या कसोटीत धावांच्या तुलनेत सर्वात मोठा विजय मिळवण्याचा विक्रम श्रीलंका महिला संघाच्या नाववावर होता. त्यांनी 1998 साली कोलंबोमध्ये पाकिस्तान महिला संघाला 309 धावांनी पराभूत केले होते.
महिलांच्या कसोटीत धावांच्या तुलनेत सर्वात मोठा विजय मिळवण्याच्या विक्रमात तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड महिला संघ असून त्यांनी दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध 1972 साली डर्बनला 188 धावांनी विजय मिळवला होता.
या विक्रमाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया महिला संघ असून त्यांनी 1949 साली ऍडलेडला इंग्लंड महिला संघाला 186 धावांनी पराभूत केले होते.
या विक्रमाच्या यादीत पाचव्या क्रमांकावर इंग्लंड महिला संघ असून त्यांनी 1949 साली ऑकलंडला न्यूझीलंड महिला संघाला 185 धावांनी पराभवाचा धक्का दिला होता.