Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीगचा हंगाम 2024 मध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे या हंगामाचा लिलाव 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईत पार पडणार आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार लिलावासाठी नोंदणी केलल्या खेळाडूंमधून 333 खेळाडूंची लिलावासाठी अंतिम निवड झाली आहे.
आयपीएल 2024 लिलावासाठी निवड झालेल्या 333 खेळाडूंमध्ये 214 भारतीय खेळाडू, 119 परदेशी खेळाडू आहेत, ज्यात 2 आयसीसीचे सहसदस्य देशांचे खेळाडू आहेत.
तसेच 333 खेळाडूंपैकी 116 कॅप (आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले खेळाडू) आणि 215 अनकॅप (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले खेळाडू) आहेत.
लिलावासाठी 333 खेळाडूंची निवड झाली असली तरी सर्व 10 संघात मिळून फक्त 77 खेळाडूंसाठी जागा रिक्त आहे. त्यामुळे जास्तीत जास्त 77 खेळाडूंवरच बोली लागू शकते. यामध्ये 30 परदेशी खेळाडूंसाठी जागा रिक्त आहे.
या 333 खेळाडूंमध्ये 23 खेळाडूंची 2 कोटी ही मुळ किंमत आहे, तर 13 खेळाडूंची 1.5 कोटी मुळ किंमत आहे.
आयपीएल 2024 हंगामाचा लिलाव दुबईमधील कोका-कोला एरिनामध्ये होणार असून या लिलावाला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.00 वाजता सुरुवात होणार आहे.