IND vs ENG: 12 वर्षे, 17 मालिका विजय...! टीम इंडियाचं मायदेशात निर्विवाद वर्चस्व

Pranali Kodre

चौथा कसोटी सामना

भारतीय संघाने 26 फेब्रुवारी 2024 रोजी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतील चौथा सामना 5 विकेट्सने जिंकला.

Team India | PTI

मालिकेत विजयी आघाडी

या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेत विजयही निश्चित केला आहे.

Team India | PTI

सलग 17 वा मालिका विजय

दरम्यान, भारताचा हा मायदेशातील सलग 17 वा मालिका विजय आहे.

Shubman Gill - Dhruv Jurel | PTI

12 वर्षांपासून अपराजित

साल 2013 पासून भारतीय संघ 17 कसोटी मालिका मायदेशात खेळला आहे. यातील सर्व कसोटी मालिकेच भारताने विजय मिळवला आहे.

Team India | PTI

अव्वल क्रमांक

त्यामुळे मायदेशात सर्वाधिक सलग मालिका विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत भारतीय संघ अव्वल क्रमांकावर आहे.

Rohit Sharma - Ravindra Jadeja | PTI

दुसरा क्रमांक

मायदेशात सर्वाधिक सलग मालिका विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे.

Australia Cricket Team | X/ICC

ऑस्ट्रेलिया - 1994 ते 2001

ऑस्ट्रेलियाने नोव्हेंबर 1994 ते जानेवारी 2001 दरम्यान मायदेशात सलग 10 मालिका जिंकल्या होत्या.

Australia Cricket Team | X/ICC

ऑस्ट्रेलिया - 2004 ते 2008

तसेच जुलै 2004 ते नोव्हेंबर 2008 दरम्यान देखील ऑस्ट्रेलियाने सलग 10 मालिका मायदेशात जिंकल्या होत्या.

Australia Cricket Team | X/ICC

'थोडा वेळ लागेल, पण...', शस्त्रक्रियेनंतर शमीची पहिली प्रतिक्रीया

Mohammad Shami Surgery | X/MdShami11