Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादला झालेल्या अंतिम सामन्यात 6 विकेट्सने पराभूत करत जिंकले.
या अंतिम सामन्यानंतर आता चारच दिवसात पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने येणार आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात 23 नोव्हेंबरपासून 3 डिसेंबरपर्यंत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे.
पुढीलवर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने ही टी20 मालिका महत्त्वाची असणार आहे.
या मालिकेसाठी भारतीय संघाने नेट्समध्ये जोरदार सराव केला आहे.
या टी20 मालिकेसाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतीय संघाचा भाग राहिलेल्या सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि प्रसिध कृष्णा या तीनच खेळाडूंचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे.
या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादव सांभाळणार आहे. तसेच पहिल्या तीन सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाड उपकर्णधार आहे, तर चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी श्रेयस अय्यर उपकर्णधार असणार आहे.