Pranali Kodre
वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे विजेतेपद पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन संघाने जिंकले. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभूत करत विश्वविजय मिळवला.
दरम्यान, पॅट कमिन्स वनडे वर्ल्डकप जिंकणारा 11 वा कर्णधार ठरला. त्याच्याआधी वनडे वर्ल्डकप जिंकणाऱ्या कर्णधारांवर एक नजर टाकू.
वेस्ट इंडिजचे कर्णधार क्लाईव्ह लॉयड यांनी 1975 आणि 1979 असे सलग दोन वर्ल्डकप जिंकले आहेत.
साल 1983 साली भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप जिंकला.
ऑस्ट्रेलियाने 1987 साली ऍलन बॉर्डर यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला.
पाकिस्तान क्रिकेट संघाला 1992 साली इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप जिंकता आला होता.
साल 1996 साली अर्जुना रणतुंगा यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने वर्ल्डकपवर नाव कोरले.
ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह वॉ यांच्या नेतृत्वाखाली साल 1999 साली दुसऱ्यांदा वर्ल्डकप ट्रॉफी उंचावली.
रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने सलग 2003 आणि 2007 साली वर्ल्डकप विजय मिळवला.
भारतीय क्रिकेट संघाने 2011 साली एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप जिंकण्याचा पराक्रम केला.
साल 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने मायदेशात मायकल क्लार्कच्या नेतृत्वाखाली पाचव्यांदा वर्ल्डकप उंचावला.
ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2019 साली वर्ल्डकप आपल्या नावे केल होता.