Manish Jadhav
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 टीम इंडियाने जिंकली. या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून भारताने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
या शानदार विजयानंतर आयसीसीच्या वनडे टीम रॅंकिंगमध्ये मोठा बदल झाला. टीम इंडिया अव्वल स्थानी पोहोचली. टीम इंडियाचे रेटिंग पॉंइट सध्या 122 आहेत. विशेष म्हणजे, इतर कोणताही संघ टीम इंडियाच्या जवळपासही नाही.
भारतानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन संघाचा धुव्वा उडवला.
तर या रॅकिंगमध्ये पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या पाकिस्तान संघाचे रेटिंग पॉइंट 106 आहेत.
चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंड संघ आहे. या संघाचे रेटिंग पॉंइट 105 आहेत. पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये फक्त एका रेटिंग पॉइंटचा फरक आहे.
आयसीसी वनडे टीम क्रमवारीत दक्षिण आफ्रिका संघ पाचव्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग पॉंइट सध्या 100 आहेत.