Manish Jadhav
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यासाठी 24 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक राहिला आहे.
दोन्ही संघ पहिला सामना खेळण्यास उत्सुक आहेत. यावेळी भारतीय संघाची धुरा युवा खेळाडू शुभमन गिलच्या खांद्यावर आहे. तो कोणत्याही परिस्थितीत पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेऊ इच्छितो.
पहिला कसोटी सामना शुक्रवार (20 जून) पासून हेडिंग्ले येथे खेळला जाणार आहे. चला तर मग या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड कसा आहे ते जाणून घेऊया...
हेडिंग्ले येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघाने 1952 मध्ये या मैदानावर पहिला सामना खेळला होता. तथापि, या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
कोणाचं पारडं जड
भारताने या मैदानावर आतापर्यंत 7 कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान, टीम इंडियाने २ वेळा विजय मिळवला आहे, तर 1 सामना अनिर्णित राहिला आणि 4 सामने इंग्लंडने जिंकले आहेत.
टीम इंडियाने या मैदानावर शेवटचा सामना 2021 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला होता. परंतु टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
20 जूनपासून टीम इंडिया या मैदानावर आठवा सामना खेळणार आहे.