Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 नोव्हेंबर रोजी वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला 70 धावांनी पराभूत केले.
भारताने या विजयासह तब्बल 12 वर्षांनी वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात धडक मारली.
यापूर्वी भारताने 2011 साली वनडे वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला होता आणि जिंकला होता.
भारताने एकूण चौथ्यांदा वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
भारताने यापूर्वी 1983, 2003 आणि 2011 साली वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला. यातील 1983 आणि 2011 साली विजय मिळवला, तर 2003 साली पराभव स्विकारावा लागला होता.
भारतीय संघाने आत्तापर्यंत चार कर्णधारांच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकपचा अंतिम सामन्याच प्रवेश केला आहे.
1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वात, 2003 साली सौरव गांगुलीच्या नेतृत्वात आणि 2011 साली एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने अंतिम सामना खेळला. आता रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ अंतिम सामना खेळेल.
वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबादला होणार आहे.