वनडेत सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटर

Pranali Kodre

उपांत्य सामना

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी खेळला गेला.

Virat Kohli | BCCI

विराटचे शतक

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शतक ठोकले. त्याने 113 चेंडूत 117 धावा केल्या.

Virat Kohli | BCCI

50 वे वनडे शतक

विराटचे हे 50 वे वनडे शतक होते. त्यामुळे तो 50 वनडे शतके ठोकणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने 291 सामन्यात 50 वनडे शतके केली.

Virat Kohli | BCCI

सचिन तेंडुलकर

विराटने सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकाच्या विक्रमाला मागे टाकले आहे. सचिनने 463 सामन्यांत 49 वनडे शतके केली आहेत.

Sachin Tendulkar | BCCI

रोहित शर्मा

रोहित शर्माने 261 सामन्यांमध्ये 31 वनडे शतके केली आहेत.

Rohit Sharma

रिकी पाँटिंग

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने 375 वनडे सामन्यांत 30 शतके केली आहेत.

Rickey Ponting | Twitter/ICC

सनथ जयसूर्या

श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटर सनथ जयसूर्याने 445 वनडे सामन्यांत 28 शतके केली आहेत.

Sanath Jayasuriya | ICC

सचिन तेंडुलकरने पहिल्या सामन्यात किती धावा केलेल्या माहित आहे का?

Sachin Tendulkar | X
आणखी बघण्यासाठी