Manish Jadhav
1990 च्या दशकात लोकप्रिय असलेली टाटा सिएरा एसयूव्ही नव्या अवतारात परत येत आहे. अलीकडेच टेस्टिंग दरम्यान ही कार पुन्हा दिसली असून, ती लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे.
टाटाने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केली नसली, तरी ही एसयूव्ही दिवाळी 2025 पर्यंत बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. कारला नुकतेच एका प्रदर्शनात सादर करण्यात आले.
नवीन सिएरामध्ये 1.5 लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, इलेक्ट्रिक व्हर्जनही उपलब्ध असेल, ज्यामध्ये 'क्वाड व्हील ड्राइव्ह' सारखे फीचर्स मिळू शकतात.
या कारचा इंटीरियर अत्यंत आलिशान आणि आधुनिक असेल. यामध्ये डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि एक मोठी टचस्क्रीन दिली जाणार आहे, ज्यामुळे केबिनचा लूक खूप प्रीमियम वाटेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कारच्या डॅशबोर्डवर तीन मोठ्या फ्लोटिंग स्क्रीन असतील, ज्यांचा आकार जवळपास 12.3 इंच असू शकतो.
यामध्ये फ्लोटिंग सेंटर कन्सोल, पॅनोरामिक सनरुफ आणि टच-बेस्ड एसी कंट्रोल्ससारखे अनेक आधुनिक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे, जे ग्राहकांना आकर्षित करतील.
बाहेरुन ही एसयूव्ही बॉक्सी आणि मजबूत डिझाइनमध्ये दिसेल. एलईडी स्ट्रिप, सीक्वेंशिअल एलईडी टर्न इंडिकेटर आणि दमदार बंपर डिझाइन तिचा लूक आणखी आकर्षक बनवतील.
कारमध्ये नवीन डिझाइनचे फोर-स्पोक स्टीअरिंग व्हील दिले जाईल, ज्याच्या मध्यभागी कंपनीचा प्रकाशित होणारा (Illuminated) लोगो असेल.