Manish Jadhav
गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात मोठी घसरण सुरु आहे. सोमवारनंतर मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे दीड टक्क्यांनी घसरले. त्यामुळे देशातील टॉप 10 कंपन्यांच्या मार्केट कॅपमधून 2.37 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन दिवसांत भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेच्या मार्केट कॅपमध्ये मोठा तोटा झाला आहे.
सेन्सेक्सबद्दल बोलायचे झाल्यास सोमवारी 1100 हून अधिक अंकांची घसरण दिसून आली. जर गेल्या दोन दिवसांबद्दल बोलायचे झाल्यास, सेन्सेक्समध्ये 1500 हून अधिक अंकांची घसरण दिसून आली आहे.
तसेच, गेल्या दोन दिवसांत निफ्टीमध्ये 464.85 अंकांची घसरण दिसून आली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे 4.59 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS च्या मार्केट कॅपला दोन दिवसात 56,243.17 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 16,18,587.63 कोटी रुपयांवरुन 15,62,344.46 कोटी रुपयांवर घसरले.
देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपला दोन दिवसांत 41,612.05 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 17,23,144.70 कोटी रुपयांवरुन 16,81,532.65 कोटी रुपयांवर घसरले.
देशातील सर्वात मोठी सूचीबद्ध टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलच्या मार्केट कॅपला दोन दिवसांत 40,860.43 कोटी रुपयांचा तोटा झाला. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 9,57,842.40 कोटी रुपयांवरुन 9,16,981.97 कोटी रुपयांवर घसरले.
देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट लेंडर HDFC बँकेच्या मार्केट कॅपला दोन दिवसांत 30,579.49 कोटी रुपयांचा तोटा झाला. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 14,31,158.06 कोटी रुपयांवरुन 14,00,578.57 कोटी रुपयांवर घसरले.
देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसच्या मार्केट कॅपला दोन दिवसांत 16,961.94 कोटी रुपयांचा तोटा झाला. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 8,30,387.10 कोटी रुपयांवरुन 8,13,425.16 कोटी रुपयांवर घसरले.