Manish Jadhav
वाढत्या वयानुसार गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या मानली जाते.
बर्याच लोकांना वाटतं की हा केवळ वृद्धत्वाचा परिणाम आहे.
पण, खरंतर काही साध्या सवयी आणि नियमित व्यायामाच्या मदतीने तुम्ही या वेदनांवर नियंत्रण मिळवू शकतो.
सौम्य व्यायाम रक्ताभिसरण वाढवतो, सांधे लवचिक ठेवतो तसेच स्नायूंना बळकटी देतो.
व्यायामामुळे मांडीचे स्नायू सक्रिय होतात. शिवाय, हांडाना मजबूती मिळते.
सरळ उभे राहा, हात कमरेवर ठेवा. त्यानंतर एक पाय सवकाश वर उचला, सरळ ठेवा आणि चार ते पाच सेकंद तसाच धरुन ठेवा. नंतर दुसऱ्या पायानेही अशीच कृती करा.
व्यायाम करताना जर वेदना वाढत असतील तर तात्काळ थांबा. स्नायूंवर ताण येईल असा व्यायाम चुकूनही करु नका.