गोमन्तक डिजिटल टीम
टाटा टेलिकॉम आणि एनटीटी डोकोमो ही जपानी कंपनी एकत्र येऊन टाटा डोकोमो ही टेलीकॉम कंपनी सुरु केली होती.
एक पैसा प्रति सेकंद असा खास प्लॅन ते ग्राहकांना देत होते. जेंव्हा इतर कंपन्या एक ते साठ सेकंदापर्यंत एक रुपया चार्ज करत होत्या.
टाटा डोकोमोमुळे मार्केटमधील इतर कंपन्यांनी देखील प्रति सेकंद शुल्क आकारणी सुरु केली होती.
तेंव्हा नेटपेक्षा एसएमएस वापर जास्त होता म्हणून डोकोमोने परवडणारे एसएमएस पॅक आणले होते.
इतक्या सुविधांमुळे टाटा डोकोमो विशेषत: तरुणांच्यात लोकप्रिय टेलिकॉम कंपनी झाली होती.
रणबीर कपूर, विजय थालापती, रामचरण हे अभिनेते डोकोमोचे ब्रँड अम्बॅसिडर होते.
सततच्या नुकसानीमुळे ही भागीदारी तुटली आणि टाटा डोकोमो कंपनी बंद झाली.