गोमन्तक डिजिटल टीम
नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात गोव्यात स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात होईल.
पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार यांची लगबगही सुरू होईल.
पक्षी निरीक्षण करणे आणि पक्ष्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करणे हे दोन्ही आनंदाचे छंद आहेत.
स्थलांतरित तसेच स्थानिक पक्ष्यांना निरखण्याची चांगली संधी नोव्हेंबर ते जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पक्षीप्रेमींना असते.
स्थलांतरित पक्ष्यांच्या जागा आणि वेळापत्रक बहुदा ठरलेले असते. अनेक छोट्याशा तळीकडे ते हटकून येतात.
आपल्या गोव्यात सुमारे 490 विविध प्रजातींचे पक्षी आहेत.
स्थलांतरित पक्ष्यांचे वेळापत्रक अगदी काटेकोर ठरलेले असते.
सावधान! मोरांच्या अधिवासात होतोय बदल? देत आहेत धोक्याची सूचना..