Sameer Panditrao
द टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स लि.ने (टीएएसएल) इंद्र या देशातील प्रमुख अभियांत्रिकी कंपनीबरोबर हवाई नजर ठेवणारे प्रगत थ्रीडी रडार तयार केले आहे.
अशा प्रकारचे रडार बनविण्याची क्षमता असणारी व पुढील पिढीतील नौदलासाठी पाळत ठेवणारी रडार यंत्रणा तयार करणारी ‘टीएएसएल’ ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.
समुद्रातील खडतर चाचण्यांनंतर या रडारचा नौदलात समावेश करण्यात आला.
या रडारच्या निर्मितीत मदत करण्यासाठी कंपनीच्या कर्नाटकातील केंद्रात रडार जुळवणूक, एकत्रीकरण व चाचणी सुविधा केंद्राची आधीच उभारणी करण्यात आली.
३ डी-एएसआर-लांझा-एन हे लांब पल्ल्याचे त्रिमितीय रणनीती पाळत ठेऊ शकणारे रडार असून ते मित्र व शत्रूच्या हवाई तसेच पृष्ठभागावरील लक्ष्यांचा अचूक शोध घेण्यास सक्षम आहे.
हे रडार ड्रोन, सुपरसॉनिक फायटर, किरणोत्सर्गविरोधी क्षेपणास्त्रे व विविध नौदल प्लॅटफॉर्म शोधण्यात प्रभावी आहे. स्पेनच्या बाहेर हे रडार प्रथमच कार्यरत होणार आहे.
या रडारमुळे नौदलाच्या तांत्रिक क्षमतेत आणखी सुधारणा झाली आहे.