Akshata Chhatre
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील 2008 च्या अंडर-19 विश्वचषक विजेता संघातील खेळाडू तन्मय श्रीवास्तव IPL 2025 मध्ये अंपायर म्हणून दिसणार.
2008 मध्ये भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजयात तन्मयने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 6 डावांमध्ये 262 धावा केल्या आणि स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता.
तन्मयने 2008 आणि 2009 मध्ये पंजाब किंग्जकडून IPL खेळलं होतं. त्यानंतर डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोची टस्कर्स केरळ संघाचाही तो भाग होता.
तन्मयने उत्तर प्रदेशसाठी 90 प्रथम श्रेणी, 44 लिस्ट ए आणि 34 टी-20 सामने खेळले. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 7000 हून अधिक धावा केल्या.
2020 मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर तन्मयने अंपायरची भूमिका स्वीकारली. विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीसह अनेक देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्याने अंपायर म्हणून काम केले आहे.
उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने पुष्टी केली आहे की, तन्मय IPL 2025 मध्ये अंपायर म्हणून दिसणार आहे. तो IPL मध्ये खेळाडू आणि अंपायर म्हणून भूमिका निभावणारा पहिला खेळाडू ठरणार आहे.
अनेक वर्षानंतर आता पुन्हा विराट आणि तन्मय एकत्र दिसणार आहेत.